नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतातील सर्वात विश्वासार्ह स्मार्टफोन सेवा प्रदाता असलेल्या रियलमीने त्याच्या रियलमी पी सिरीज ५जी मधील रियलमी पी वन प्रो ५जी आणि रियलमी पी वन ५जी हे नवीनतम स्मार्टफोन्स लाँच करत असल्याची अतिशय उत्साहात घोषणा केली. ही दोन्ही अत्याधुनिक उपकरणे त्यांचे उत्कृष्ट परफॉर्मंस, वापरासंबंधीचा अप्रतिम अनुभव आणि भारतीय ग्राहकांसाठी खासकरून फ्लिपकार्टवरील उपलब्धतेसह मध्यम-श्रेणीच्या स्मार्टफोन प्रकारांत अभूतपूर्व एंट्री करण्यासाठी तयार आहेत. रियलमी या नव्या पी सीरीज सोबतच रियलमी पॅड २, वाय- फाय व्हेरिएंट आणि रियलमी टी ११० बड्स देखील लाँच करणार आहे.
रियलमी पी वन प्रो ५जी हा स्नॅपड्रॅगन ६ जेन वन ५जी चिपसेट, ओआयएस युक्त ५० एमपी सोनी एलवायटी-६०० कॅमेरा आणि १२० एचझेड कर्व्ह व्हिजन डिस्प्लेच्या साहाय्याने गेमिंगच्या अनुभवात भर घालतो. हा २५६ जीबी पर्यंत मोठी स्टोरेज क्षमता आणि ८ जीबी + ८ जीबी पर्यंत डायनॅमिक रॅमदेखील ऑफर करतो. रियलमी पी वन प्रो ५जी हा फोनिक्स रेड आणि पॅरोट ब्ल्यू या दोन रंगांमध्ये आणि ८ जीबी +१२८ जीबी (रुपये किंमत २१,९९९) आणि ८ जीबी + २५६ जीबी (रुपये किंमत २२,९९९) या दोन स्टोरेज प्रकारांमध्ये येतो.
रियलमी पी वन ५जी मध्ये एक जबरदस्त मीडियाटेक डायमेन्सिटी ७०५० ५जी चिपसेट, एक उत्कृष्ट १२० एचझेड एमोलेड डिस्प्ले, सुपरफास्ट ४५ब्ल्यू सुपरवूक चार्जिंग आणि ५००० एमएएच ची भक्कम बॅटरी उपलब्ध आहे.हा डिव्हाईस पक्षी संस्कृतीने प्रेरित डिझाइन आणि अप्रतिम व्हिज्युअल्स कॅप्चर करण्यासाठी ५० एमपी एआय कॅमेऱ्याला प्रदर्शित करतो. रियलमी पी वन ५ जी हा ६ जीबी + १२८ जीबी
(किंमत १५,९९९ रुपये) आणि ८ जीबी + २५६ जीबी (किंमत १८,९९९ रुपये) दोन वेगवेगळ्या स्टोरेज प्रकारांसह फोनिक्स रेड आणि पिकॉक ग्रीन अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
रियलमी पॅड २, वाय -फाय व्हेरियंटमध्ये १२० एचझेड २के चा मोठा डिस्प्ले, ३३ डब्ल्यू सुपरवूक चार्जिंग सिस्टम आणि ८३६० एमएएचच्या पॉवरफुल बॅटरीसह येतो, याची किंमत रु.१७,९९९ इतकी आहे.
रियलमी टी ११० वायरलेस इअरबड्समध्ये १० एमएम डायनॅमिक बास ड्रायव्हर उपलब्ध आहे आणि हे एकूण ३८ तासांचा आकर्षक प्लेबॅक ऑफर करतो. विशेष म्हणजे, यास आयपी एक्स ५ वॉटर रेझिस्टन्स रेटिंग प्राप्त आहे, याची किंमत रु.१४९९ इतकी आहे.
या लाँचविषयी बोलताना रियलमीचे प्रवक्ते म्हणाले, “आम्ही रियलमी पी सिरीज ५जी लाँच करण्यासाठी अतिशय उत्साही आहोत, स्मार्टफोन उद्योगातील परफॉर्मंस स्टॅंडर्ड्स नव्याने परिभाषित करण्यासाठी हा स्मार्टफोन तयार आहे. रियलमी पी सिरीज ५जी च्या माध्यमातून आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगत फीचर्स सादर केली आहेत, जी मध्य-श्रेणीच्या सेग्मेंटला पुन्हा नव्याने परिभाषित करतील. पी सीरीजच्या या नव्या प्रॉडक्ट याव्यतिरिक्त आम्ही रियलमी पॅड २, वाय -फाय व्हेरियंट आणि रियलमी टी ११० बड्स लाँच करण्यास देखील उत्सुक आहोत. आम्हाला खात्री आहे, की हा स्मार्टफोन्स आणि ही एआयओटी उत्पादने बाजारात नाविन्यपूर्ण आणि ट्रेंडसेटिंग स्मार्टफोन ऑफर करणारा ब्रँड म्हणून आमचे स्थान आणखी मजबूत करतील. यावर्षी नवीन पी सीरीज लाँच करून फ्लिपकार्टवर ५० दशलक्ष विक्रीचा टप्पा गाठण्याचे आमचे ध्येय आहे.