इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पाहिजे तेवढा निधी देईल, पण, आमच्यासाठी कचा कचा बटण दाबा, बटन दाबले तरच निधी देता येईल नाहीतर आखडता हात घेणार असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचार सभेत केल्यानंतर त्यावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका सुरु केली आहे.या वक्तव्याचा धागा पकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी थेट सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी असे म्हटले आहे.
रोहित पवार यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे, अजितदादांनी सभेत भाषण करताना निधीबाबत वक्तव्य केल्याचं समोर आलं. दादा नेमके कोणत्या निधीबाबत बोलत आहेत? मलिदा_गँगचे सदस्य असलेल्या त्यांच्या मित्रांकडे असलेल्या निधीबाबत की सरकारी विकास निधीबाबत? जनता साथ देत नाही म्हणून आता निधीची धमकी देणे हा आचार संहितेचा भंगच म्हणावा लागेल! निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी!
खऱ तर अजित पवार व रोहित पवार हे दोन्ही काका पुतणे आहे. पण, राष्ट्रवादी फुटीनंतर दोघांच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या. त्यामुळे आता हे दोन्ही नेते एकमेकांविरुध्द थेट बोलू लागले आहे. त्यात त्यांनी आता कारवाईचीच मागणी केल्यामुळे हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे.