इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रत्नागिरी सिंधुदुर्ग महाआघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस असे पक्ष मिळून जेमतेम १२०० लोकांनी राऊत यांना समर्थन दर्शवले आणि एका लहान हॉलमध्ये कार्यक्रम घेऊन विषय संपवला.
तसं बघायला गेलं तर हल्ली १२०० लोकं जमवणं म्हणजे विनायक राऊतांसाठी शिवाजी पार्क भरल्यासारखं असल्याची टीका भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी केली.
रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघात नारायण राणे यांना उमेदवारी मिळणार असे निश्चित असल्याचे समजून राणे परिवार जोरदार प्रचार करत आहे. त्यात ते ठाकरे गटाचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. काल उमेदवारी अर्जावरुनही त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.