नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कुलकर्णी गार्डन भागात भरधाव दुचाकी घसरल्याने ६४ वर्षीय वृध्द ठार झाले. अनिल राम पुरी (रा.युनिटी पार्क,विसेमळा कॉलेजरोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पुरी सोमवारी (दि.१५) रात्री आपल्या दुचाकीवर कुलकर्णी गार्डन मार्गे घराकडे जात असतांना हा अपघात झाला. सोनी पैठणी दुकाना समोरील वळणावर भरधाव दुचाकी घसरल्याने पुरी गंभीर जखमी झाले होते.
मुलगा ऋषी पुरी याने त्यांना तातडीने मॅग्नम हॉस्पिटल मार्फत जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक गायकवाड करीत आहेत.