जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील एमआयडीसीमधील डी सेक्टर मधील मोरया केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना सकाळी ९ वाजता घडली. या आगीत २० हून अधिक कामगार गंभीररित्या भाजले आहेत. तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. या जखमींना खासगी व शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या आगीनंतर औद्योगिक वसाहत मधील अग्निशमन बंब, महानगरपालिका अग्निशमन बंब, जैन हिल्स येथील अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
या आगीनंतरतीन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार घटनास्थळी गेल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. दिपक वामन सुहा, सुरेश राजेंद्र कोळी, करण जसबीर संधू , मयूर राजू खंगार, सचिन श्रावण चौधरी,नंदू छगन पवार,चंद्रकांत लक्ष्मण पाटील ही जखमींची नावे आहे.
सारा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधून एकूण ७ रुग्णांना सेवा देण्यात आली आहे आणि त्यांना सुपूर्द करण्यात आले आहे
- जळगाव सिव्हिल हॉस्पिटल (३ पेशंट)
- ओम क्रिटिकल केअर हॉस्पिटल (१ रुग्ण)
- खुशी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (१ रुग्ण)
- नवीन मंगल मूर्ती हॉस्पिटल (२ रुग्ण).