विजय वाघमारे, जळगाव
जळगाव – माजी मंत्री एकनाथ खडसे यांना दाऊद इब्राहीम आणि छोटा शकील गॅगकडून फोनवर धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकरणी आमदार खडसेंनी अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे.
खडसे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, चार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून त्यांना १५ आणि १६ एप्रिल रोजी फोन करण्यात आले. त्यात बोलणारे व्यक्ती खडसेंना म्हणाले की, हम दाउद इब्राहिम कासरकर के आदमी है हम…..को मार डाला, अब तुम छोटा शकील को मार डालो, नही तो तुमारी खैर नही, अशी धमकी दिली.
त्यावर खडसे यांनी विचारले की, तुम जो ये दाउद शकील नाम ले रहे हो. ये कोण है? मै पहचानता नही. त्यावर समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने दाऊद, शकील ये डॉन है, और तुमको मार देंगे, असे बोलून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर एकनाथराव खडसे यांनी मोबाईलवरून धमकी देणाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल दिली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.