नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नातेवाईक यांच्याविरुद्ध अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये सहकार्य करण्यासाठी पाच हजाराच्या लाच प्रकरणात पोलिस नाईक तुकाराम खेडकर व दोन खासगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, यातील तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांच्याविरुद्ध नेवासा पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या भा.द. वि. कलम ३२४ वगैरे गुन्ह्यामध्ये सहकार्य करण्यासाठी नंदू सरोदे,खाजगी इसम व आलोसे खेडकर हे तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपये लाच मागणी करत असले बाबतची तक्रार ला प्र वि अहमदनगर कडे १२ एप्रिल रोजी प्राप्त झाली होती. त्यानुसार १२ एप्रिल रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली, पडताळणी दरम्यान खाजगी इसम नंदू सरोदे यांनी तक्रारदार यांच्याकडे आलोसे खेडकर यांच्या करिता दहा हजार रुपये लाचेची मागणी केली तसेच खाजगी इसम पोपट सरोदे यांनी तक्रारदार यांना आलोसे खेडकर यांच्याकडे नंदू सरोदे यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम देण्याकरिता प्रोत्साहन दिले. त्यानंतर १६ एप्रिल रोजी आलोसे खेडकर यांच्याविरुद्ध लाच मागणी पडताळणी केली असता त्या दरम्यान आलोसे खेडकर यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या विरुद्ध दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती आठ हजार रुपये लाचेची मागणी करून पाच हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार आज १६ एप्रिल रोजी आलोसे खेडकर यांचे विरुद्ध सापळा कारवाई आयोजित करण्यात आली. त्या दरम्यान आलोसे पोलीस नाईक तुकाराम भीमराव खेडकर यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली त्यावेळी त्यांना लाच रकमेसह रंगेहात पकडण्यात आले आहे. आलोसे पोलीस नाईक तुकाराम भीमराव खेडकर, खाजगी इसम नंदू सरोदे व खाजगी इसम पोपट सरोदे यांचे विरुद्ध नेवासा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
*यशस्वी सापळा कारवाई
*युनिट -अहमदनगर.
*तक्रारदार- पुरुष,वय- 44 वर्ष
*आलोसे- तुकाराम भीमराव खेडकर, वय-35 वर्ष, पद-पोलीस नाईक/2127,वर्ग-3,
नेमणूक- नेवासा पोलीस स्टेशन,ता. नेवासा,जि. अहमदनगर, हल्ली राहणार – राधाकिसन गिरी यांचे घरात भाड्याने ,नेवासा फाटा ,तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर ,मूळ राहणार -कोनोशी ,तालुका शेवगाव ,जिल्हा अहमदनगर
2) नंदू पांडुरंग सरोदे, खाजगी इसम, रा. देवसडे, ता.नेवासा, जि.अहमदनगर,
3) खाजगी इसम पोपट सरोदे, पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही,
लाचेची मागणी–दि.12/04/2024 रोजी 10,000/- रु. 16/04/2024 रोजी 8,000/- रुपये तडजोडी अंती 5,000/- रुपये
*लाच स्विकारली- 5,000/ रुपये दिनांक-16/04/2024 रोजी
*हस्तगत रक्कम- 5,000/-रुपये
*लाचेचे कारण- यातील तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांच्याविरुद्ध नेवासा पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या भा.द. वि. कलम 324 वगैरे गुन्ह्यामध्ये सहकार्य करण्यासाठी नंदू सरोदे,खाजगी इसम व आलोसे खेडकर हे तक्रारदार यांच्याकडे 10,000/-रुपये लाच मागणी करत असले बाबत ची तक्रार ला प्र वि अहमदनगर कडे दिनांक 12/04/2024 रोजी प्राप्त झाली होती.त्यानुसार दिनांक 12/04/2024 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली, पडताळणी दरम्यान खाजगी इसम नंदू सरोदे यांनी तक्रारदार यांच्याकडे आलोसे खेडकर यांच्या करिता 10,000/- रुपये लाचेची मागणी केली तसेच खाजगी इसम पोपट सरोदे यांनी तक्रारदार यांना आलोसे खेडकर यांच्याकडे नंदू सरोदे यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम देण्याकरिता प्रोत्साहन दिले. त्यानंतर दिनांक 16/04/2024 रोजी आलोसे खेडकर यांच्याविरुद्ध लाच मागणी पडताळणी केली असता त्या दरम्यान आलोसे खेडकर यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या विरुद्ध दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 10,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 8,000/- रुपये लाचेची मागणी करून 5,000/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार आज दिनांक 16/04/2024 रोजी आलोसे खेडकर यांचे विरुद्ध सापळा कारवाई आयोजित करण्यात आली. त्या दरम्यान आलोसे पोलीस नाईक/ 2127 तुकाराम भीमराव खेडकर यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडून 5,000/- रुपये लाच रक्कम स्वीकारली त्यावेळी त्यांना लाच रकमेसह रंगेहात पकडण्यात आले आहे. आलोसे पोलीस नाईक /2127 तुकाराम भीमराव खेडकर, खाजगी इसम नंदू सरोदे व खाजगी इसम पोपट सरोदे यांचे विरुद्ध नेवासा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
- पर्यवेक्षण अधिकारी – श्री.प्रवीण लोखंडे पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. अहमदनगर.
- सापळा व तपास अधिकारी – श्रीमती छाया.के .देवरे,पोलिस निरीक्षक,ला.प्र. वि. अहमदनगर