गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नागपूरमध्ये अभिनेता खासदार मनोज तिवारी गडकरींच्या प्रचाराला

by India Darpan
एप्रिल 16, 2024 | 11:45 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
DSC 0665 01 1

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नागपूर लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी अभिनेता खासदार मनोज तिवारी हे मंगळवारी प्रचाराला आले. यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत भाषण देऊन उपस्थितांची मने जिंकली. त्यांनी नितीन गडकरी यांना ‘ज्येष्ठ बंधू’ असा उल्लेख केला. ते म्हणाले, ‘नितीनजी माझे ज्येष्ठ बंधू आहेत. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात नितीनजींच्याच माध्यमातून झाली. त्यामुळे त्यांच्यासाठी येथे बोलण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य समजतो. नागपूरकर जनता त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देणार याचा मला पूर्ण विश्वास आहे.’

यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, आपल्याला कामाच्या भरवशावर निवडून येणे शक्य नाही, हे माहिती असल्याने काँग्रेसवाले जातीचे कारण देऊन मत मागत आहेत. मतांसाठी जातीय वातावरण तयार केले जात असल्याची प्रतिक्रिया लोकांमधून उमटत आहे. मी जातीचे राजकारण कधीही केले नाही. लोकांची सेवा करण्यावर भर दिला आणि प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळे निवडणुकीत जातीवर नाही, कामावरच मोहोर लागेल,’ असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (मंगळवार) व्यक्त केला.

पश्चिम नागपुरातील गिट्टीखदान चौक येथे नितीन गडकरी यांची सभा आयोजित करण्यात आली. यावेळी प्रसिद्ध अभिनेते खासदार मनोज तिवारी, भाजपचे ज्येष्ठ नेते संजय भेंडे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर माया इवनाते, माजी उपमहापौर संदीप जाधव, जयप्रकाश गुप्ता आदींची प्रमुख उपस्थिती होती. गडकरी म्हणाले, ‘काँग्रेसच्या नेत्यांना गरीब कुटुंबातील मुलांना रोजगार कसा मिळेल याची चिंता नाही. त्यांना आपल्या मुलांच्या रोजगाराची चिंता आहे. आम्ही राजकारणाचा उद्योग केला नाही आणि हे लोकांना माहिती आहे. कारण ये पब्लिक है सब जानती है.’

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा उच्चांक; तीन लक्ष कोटींचा टप्पा पार

Next Post

रामटेकमध्ये मुख्यमंत्र्यांची शिवसेनेच्या उमेदवारांसाठी सभा…केले हे आवाहन

India Darpan

Next Post
PHOTO 5 scaled e1713291703811

रामटेकमध्ये मुख्यमंत्र्यांची शिवसेनेच्या उमेदवारांसाठी सभा…केले हे आवाहन

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011