गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा उच्चांक; तीन लक्ष कोटींचा टप्पा पार

by India Darpan
एप्रिल 16, 2024 | 11:37 pm
in संमिश्र वार्ता
0
MahaGST Mumbai 1200x675 1 1140x570 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र राज्याने वस्तू व सेवा कर संकलनात सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात उच्चांक गाठलेला असून वस्तू व सेवा कर प्रणाली लागू झाल्यापासून पहिल्यांदाच रूपये ३ लक्ष कोटींचा टप्पा पार केलेला आहे. या वर्षी राज्याचे वस्तू व सेवा कर संकलन, रूपये ३.२ लक्ष कोटी एवढे झाले असून गतवर्षीच्या तुलनेत त्यामध्ये १८ टक्के एवढी घसघशीत वाढ नोंदवलेली असल्याची माहिती मुंबईचे राज्यकर उपआयुक्त यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे दिली आहे.

महाराष्ट्र राज्यातील वस्तू व सेवा कर संकलनाचा देशातील (रूपये २०.२ लक्ष कोटी) सकल वस्तू व सेवा कर संकलनातील वाटा १६ टक्के नोंदविला असून गतवर्षीच्या तुलनेत (१५ टक्के) त्यामध्ये सुमारे १ टक्का वाढ दिसून येत आहे. तसेच वस्तू व सेवा कर संकलनातील राज्याचा वाढीचा दर (१८ टक्के) हा देशाच्या सरासरी दरापेक्षा (१२ टक्के) अधिक आहे.

राज्याच्या निव्वळ महसुलाचा विचार करता, राज्यास वस्तू व सेवा करातून रूपये १,४१,७०० कोटी एवढ़ा उच्चांकी महसूल मिळालेला असून त्यामध्ये राज्य व सेवा कर (SGST) रूपये ९३,४०० कोटी तर एकात्मिक करातील राज्याच्या वाट्यामधुन रूपये ४८,३०० कोटी एवढा महसुल प्राप्त झालेला आहे. राज्य वस्तू व सेवा कर महसुलात राज्याने गतवर्षीच्या तुलनेत २०.२ टक्के एवढी वृद्धी नोंदवलेली असून एकात्मिक करातील राज्याच्या वाट्यामध्येही २४ टक्के (मागील वर्षातील Ad hoc वगळता) एवढी वृद्धी दिसत आहे. पेट्रोल व मद्य उत्पादनावरील मूल्यवधीत कराचा महसूल रूपये ५३,२०० कोटी एवढा आहे.

वस्तू व सेवा कर, मुल्यवर्धित कर, व्यवसाय कर यांच्या एकंदरीत महसुलाचा राज्यातील वृद्धी दर हा ११ टक्के असुन तो सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील अंदाजित सकल राज्य उत्पादनातील वृद्धी दराहून (१० टक्के) अधिक आहे. एकंदरीत महसुल जमा ही २०२३-२४ साठी निर्धारीत अर्थसंकल्पीय अंदाज रूपये १.९५ लक्ष कोटीहून ही अधिक आहे.

महितीच्या विश्लेषणाच्या आधारे करण्यात आलेल्या धडक कारवायामध्ये अन्वेषण शाखेने जवळपास १२०० प्रकरणात २००० कोटी रूपयांचा महसुल गोळा करून दिलेला आहे. तसेच २४ प्रकरणात अटकेच्या कारवाया केल्या आहेत. अन्वेषण शाखेने गोळा केलेला महसुल हा आतापर्यंतच्या सर्व आर्थिक वर्षांतील सर्वाधिक आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

६.४० कोटींच्या कर चोरीप्रकरणी जीएसटी विभागाकडून जैन पती पत्नीला अटक

Next Post

नागपूरमध्ये अभिनेता खासदार मनोज तिवारी गडकरींच्या प्रचाराला

India Darpan

Next Post
DSC 0665 01 1 scaled e1713291286165

नागपूरमध्ये अभिनेता खासदार मनोज तिवारी गडकरींच्या प्रचाराला

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011