मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगावात दाभाडी येथे भाजप विरोधात असलेल्या चिंतन सभेत भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून पोस्टर फाडल्याची घटना घडली. करणी सेनेच्या कार्यक्रमाचे आयोजन दाखवून भाजप उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांच्या विरोधात ही चिंतन सभा आयोजित केल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी भर सभेतून बॅनर काढल्याने चांगलाच गोंधळ उडाला.
लोकसभा निवडणुक २०२४ निष्क्रिय, भ्रष्ट व लबाड खासदार आयात उमेदवार चिंतन बैठक अशा आशयाचा बॅनर या सभेत लावण्यात आला होता.
कार्यक्रमाची कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी दिली. या बैठकीत धुळ्याचे अनिल गोटे, डॉ.विलास बच्छाव, श्याम सनेर यांच्यासह भाजपचा आणि काँग्रेसचा नाराज गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.









