रविवार, ऑगस्ट 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत महाराष्ट्रातील हे ८७ हून अधिक उमेदवार यशस्वी…

by Gautam Sancheti
एप्रिल 16, 2024 | 9:17 pm
in संमिश्र वार्ता
0
upsc

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातील एकूण १०१६ उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील ८७ हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास ८.६ टक्के महाराष्ट्रातून आहेत. राज्यातून समीर प्रकाश खोडे प्रथम, देशात त्यांनी ४२ वा क्रमांक पटकाविला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष २०२३ च्या मुख्य परिक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या १०० उमेदवारांमधे महाराष्ट्रातील तीन उमेदवारांचा समावेश आहे. नेहा राजपूत यांनी ५१ वा तर अनिकेत हिरडे यांनी ८१ वा क्रमांक पटकावला आहे.

एक नजर निकालावर
समीर प्रकाश खोडे (४२) नेहा उद्धवसिंग राजपूत (५१) अनिकेत ज्ञानेश्वर हिर्डे (८१) विनय सुनील पाटील (१२२) विवेक विश्वनाथ सोनवणे (१२६) तेजस सुदीप सारडा (१२८) जान्हवी बाळासाहेब शेखर (१४५) आशिष अशोक पाटील (१४७) अर्चित पराग डोंगरे (१५३) तन्मयी सुहास देसाई (१९०) ऋषिकेश विजय ठाकरे (२२४) अभिषेक प्रमोद टाले (२४९) समर्थ अविनाश शिंदे (२५५) मनीषा धारवे (२५७) शामल कल्याणराव भगत (२५८) आशिष विद्याधर उन्हाळे (२६७) शारदा गजानन मद्येश्वर (२८५) निरंजन महेंद्रसिंह जाधवराव (२८७) समिक्षा म्हेत्रे (३०२) हर्षल भगवान घोगरे (३०८) वृषाली संतराम कांबळे (३१०) शुभम भगवान थिटे (३५९) अंकेत केशवराव जाधव (३९५) शुभम शरद बेहेरे (३९७) मंगेश पाराजी खिलारी (४१४) मयूर भारतसिंग गिरासे (४२२) अदिती संजय चौगुले (४३३) अनिकेत लक्ष्मीकांत कुलकर्णी (४३७) क्षितिज गुरभेले (४४१) अभिषेक डांगे (452) स्वाती मोहन राठोड (४९२) लोकेश मनोहर पाटील (४९६) सागर संजय भामरे (५२३) मानसी नानाभाऊ साकोरे (५३१) नेहा नंदकुमार पाटील (५३३) युगल कापसे (५३५) हर्षल राजेश महाजन (५३९) अपूर्व अमृत बालपांडे (५४६) शुभम सुरेश पवार (५६०) विक्रम जोशी (593) प्रियंका मोहिते (595) अविष्कार डेरले (604) केतन अशोक इंगोले (६१०) राजश्री शांताराम देशमुख (६२२) संस्कार निलाक्ष गुप्ता (६२९) सुमित तावरे (655) सुरेश लीलाधरराव बोरकर (६५८) अभिषेक अभय ओझर्डे (६६९) नम्रता घोरपडे (675) जिज्ञासा सहारे (681) श्रृति कोकाटे (685) अजय डोके(687) सूरज प्रभाकर निकम (706) श्वेता गाडे (711) अभिजित पखारे (720) कृणाल अहिरराव (732) हिमांशु टेभेंकर (738) सुमितकुमार धोत्रे (750) गौरी देवरे (759) प्रांजली खांडेकर (७६१) प्रितेश बाविस्कर (767) प्रशांत डांगळे (775) प्रतिक मंत्री (786) मयुरी माधवराव महल्ले (७९४) राहुल पाटील (804) सिध्दार्थ तागड (809) प्राजंली नवले (815) सिध्दार्थ बारवळ (823) ओमकार साबळे (844) प्रशांत सुरेश भोजने (८४९) प्रतिक बनसोडे (862) चिन्मय बनसोड (893) निखील चव्हाण (900) विश्वजीत होळकर (905) अक्षय लांबे (908) निलेश डाके (918) किशनकुमार जाधव (923) ऐश्वर्या दादाराव उके (९४३) स्नेहल वाघमारे (945) शुभम त्रंबकराव डोंगरदिवे (९६३) गौरव हितेश टेंभुर्णीकर (९६६) मयांक खरे (९६८) शिवानी वासेकर (९७१) श्रावण अमरसिंह देशमुख (९७६) श्रुती उत्तम श्रोते (९८१) सुशीलकुमार सुनील शिंदे (९८९) आदित्य अनिल बामणे (१०१५)

केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी सप्टेंबर 2023 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली. जानेवारी – एप्रिल 2024 दरम्यान परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 1016 उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सामान्य (ओपन) गटातून –347, आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) 115, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) – 303, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) – 165, अनुसूचित जमाती प्रवर्गातून- 86 उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये 37 दिव्यांग उमेदवारांचा (16 ऑर्थोपेडिकली अपंग, 06 दृष्टीहीन, 05 श्रवणदोष आणि 10 एकाधिक अपंग) यांचा समावेश आहे. लोकसेवा आयोगाने 240 उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List) तयार केली आहे. यामध्ये सामान्य गट- 120, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)- 36, इतर मागास वर्ग -66, अनुसूचित जाती- 10, अनुसूचित जमाती – 04 उमेदवारांचा समावेश आहे. यासोबत एकूण चार दिव्यांग उमेदवारांचा समावेश आहे.

या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू
भारतीय प्रशासन सेवा (आयएएस) या सेवेत शासनाकडे एकूण -180 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (जनरल) – 73, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 17 इतर मागास वर्ग (ओबीसी) –49, अनुसूचित जाती (एससी) – 27, अनुसूचित जमाती (एसटी) 14 जागा रिक्त आहेत. उमेदवारांच्या गुणानुक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाईल.

भारतीय विदेश सेवा (आयएफएस) या सेवेत शासनाकडे एकूण – 37 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – 16, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 04, इतर मागास वर्ग (ओबीसी) – 10, अनुसूचित जाती (एससी) – 05, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 02 जागा रिक्त आहेत.

भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) या सेवेमध्ये एकूण – 200 जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 80, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 20, इतर मागास प्रवर्गातून – 55, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 32, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 13 उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.

केंद्रीय सेवा गट अ – या सेवेमध्ये एकूण – 613 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 258, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 64 , इतर मागास प्रवर्गातून – 160, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 86 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून –45 उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल.

केंद्रीय सेवा गट ब – या सेवेमध्ये एकूण – 113 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 47, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 10 उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून – 29, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 15 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून -12 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

एकूण 355 उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरुपाची असेल. अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींनी येणारी संधी सोडू नये…जाणून घ्या, बुधवार, १७ एप्रिलचे राशिभविष्य

Next Post

दाभाडीत भाजपा कार्यकर्त्यांनी भर सभेत फलक फाडला…चिंतन सभेत गोंधळ

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Screenshot 20240416 212823 WhatsApp

दाभाडीत भाजपा कार्यकर्त्यांनी भर सभेत फलक फाडला…चिंतन सभेत गोंधळ

ताज्या बातम्या

Untitled 2

ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची धमकी…नेमकं घडलं काय

ऑगस्ट 3, 2025
unnamed 6

नाशिक जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेला सुरवात…विरल आणि अन्यना यांची उत्तम कामगिरी

ऑगस्ट 3, 2025
crime 12

मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले…वेगवेगळया भागातील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

ऑगस्ट 3, 2025
image0037LA4 e1754183811326

जळगावात जमले भारताचे भावी बुद्धिबळपटू: ११ वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेला सुरुवात

ऑगस्ट 3, 2025
IMG 20250802 WA0467 e1754183550323

मठाच्या माधुरी हत्तीणी स्थलांतराबाबत वनताराने केली आपली भूमिका स्पष्ट….

ऑगस्ट 3, 2025
3 1024x683 1

दीडशे दिवस उपक्रमात होणार अनुकंपाच्या सर्व पदांची भरती…अतिरिक्त जिल्हाधिकारी होणार आरडीसी

ऑगस्ट 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011