माणिकराव खुळे
दहा दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे वातावरण असल्याचा अंदाज हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे उष्णतेची लाट, रात्रीचा उकाडा, किनार पट्टीवरील दमटयुक्त उष्णता बाबतही त्यांनी माहिती दिली आहे.
१- अवकाळीचे वातावरण-
मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात आजपासून (१६-२५ एप्रिल ) दहा दिवस ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी भाग बदलत किरकोळ अवकाळी ( गडगडाट, वीजा, वारा) पावसाची शक्यता जाणवते. मुंबईसह कोकणात मात्र आजपासून केवळ (१६,१७,१८एप्रिल ) तीन दिवस अवकाळी वातावरणाची शक्यता जाणवते.
२- उष्णतेची लाट-
मुंबईसह उत्तर कोकणातील पालघर ठाणे जिल्ह्यात आज, उद्या व परवा म्हणजे मंगळवार ते गुरुवार (१६-१८ एप्रिल) रोजी तीन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता जाणवते.
३-रात्रीचा उकाडा-
मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अश्या १० जिल्ह्यात आज, उद्या व परवा म्हणजे मंगळवार ते गुरुवार (१६-१८ एप्रिल) रोजी दिवसा चांगलीच उष्णतेची काहिली तर रात्री उकाडा जाणवू शकतो.
४- किनार पट्टीवरील दमटयुक्त उष्णता-
मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात तसेच लगतच्या गोवा व गुजराथ राज्यात आज, उद्या व परवा म्हणजे मंगळवार ते गुरुवार (१६-१८ एप्रिल) रोजी दिवसा दमटयुक्त उष्णतेचा अनुभव येईल.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd )
IMD Pune.