नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जलसमृद्ध नाशिक फाउंडेशन तर्फे गंगाव-हे येथे आयोजित गंगापूर धरणातील गाळ काढणे कामाच्या शुभारंभ आज जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या उपस्थितीत झाला. या अभियानाची सुरुवात ५ पोकलेन मशीन व २५ ट्रॅक्टर, टिप्परच्या साह्याने करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मशीन पूजन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अर्जुन गुंडे, प्रांताधिकारी जितीन रहमान, अधिक्षक अभियंता मृद व जलसंधारण हरिभाऊ गीते, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग सोनल शहाणे आदी उपस्थित होते. जलसमृद्ध नाशिक अभियान २०२४ या उपक्रमाचा उद्देश व गत पंधरा दिवसातील सकारात्मक घटनाक्रम बीजेएसचे राज्य अध्यक्ष नंदकिशोर साखला यांनी आपल्या प्रास्ताविकात नमूद केला व सर्वांच्या सहकार्याने तसेच तन-मन-धनाच्या सहभागाने सदरील अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले.
नाशिकच्या सर्व स्वयंसेवी, बांधकाम, औद्योगिक,व्यापारी, व्यावसायिक संघटनांच्या सहभागातून व जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मानद अध्यक्षतेखाली गाळमुक्त धरण – गाळ युक्त शिवार अंतर्गत जल समृद्ध नाशिक अभियान कार्यरत झालेले आहे. नाशिककरांच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी व महत्त्वपूर्ण जलसमृद्ध नाशिक अभियानास भारतीय जैन संघटना, नाशिक मानव सेवा फाउंडेशन व आर्ट ऑफ लिव्हिंग चे पाठबळ लाभले आहे. जिल्हाधिकारी व समृद्ध नाशिक फाउंडेशनच्या संयोजकांनी केलेल्या आवाहनाला उपस्थित उद्योजक, व्यापारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपला आर्थिक सहभाग घोषित केला.
जलसमृद्ध नाशिक अभियानास उत्स्फूर्त पणे आज रोजी मिळालेली देणगी पुढील प्रमाणे…
पियुष सोमानी इएसडीएस टेक्नॉलॉजी ११०००००
ताराचंद गुप्ता फाउंडेशन, श्री मंगल ग्रुप ५०००००
भाविक जयेश ठक्कर ५०००००
नाशिक मानव सेवा फाउंडेशन ५०००००
एबीएच डेव्हलपर्स ५०००००
सुरेश अण्णाजी पाटील श्रद्धा लँड डेव्हलपर्स ५०००००
सागर बोंडे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स २०००००
सुमेरकुमार काले अध्यक्ष मांगीतुंगी ट्रस्ट १११०००
पर्वतराज गुरड्डी सोमेश फोर्ज १०००००
पॅटको इंडस्ट्रीज रवींद्र पाटील १०००००
डॉ उमेश मराठे १०००००
गंगाव-हे सावरगाव ग्रामस्थ ११०००
डॉ प्रतिभा नितीन बोरसे ११०००
जलसमृद्ध नाशिक अभियानास प्राप्त देणगीदारांना आयकर 80 जी कलमानुसार किंवा कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व नुसार प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.या अभियानानुसार धरणातील गाळ यंत्रांच्या साह्याने काढून परिसरातील शेतकऱ्यांनी आणलेल्या ट्रॅक्टर, टिप्पर मध्ये भरून देण्याची जबाबदारी व खर्च फाउंडेशन उचलणार असून हा अत्यंत सुपीक गाळ शेतकऱ्यांना, नागरिकांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी, नागरिकांनी स्वखर्चाने गाळ वाहून न्यावयाचा आहे. धरणातील सुपीक गाळ शेतजमिनीचा पोत सुधारण्यास व उत्पादन क्षमता वाढविण्यास अत्यंत उपयोगी आहे. ज्या शेतकऱ्यांना शेतीसाठी किंवा शहरातील नागरिकांना वृक्षारोपणासाठी गाळ आवश्यक असल्यास 744 744 37 66 या क्रमांकावर संपर्क साधावा.
कार्यक्रमात विजय हाके, राजा जॉली, पियुष सोमानी, मकरंद सावरकर, शिंदे, लक्ष्मण बेंडकुळे यांनी मनोगत व्यक्त केले व उपयोगी सूचना केल्या.सर्वांचे स्वागत व सूत्रसंचालन संजय सोनवणे यांनी केले तर आभार रमेश वैश्य यांनी मानले.गंगाव-हे सावरगाव ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास सुनील गावडे, गोपाल अटल, कृणाल पाटील, जयेश ठक्कर,राजा जॉली, विजय हाके, संजय सोनवणे, मनोज साठे, दत्तू ढगे, धनंजय बेळे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ सुधीर संकलेचा, सेक्रेटरी डॉ खैरनार, बीजेएस चे दीपक चोपडा, ललित सुराणा, रोशन टाटिया, राजू चोरडिया, डॉ प्रमोद छोरीया, राजू लोढा, केतन ओस्तवाल, सार्थक साखला, विजय बाविस्कर, श्रीकांत बेनी, वासुदेव भगत, विनोद गणेरीवाल, ओम रूंगटा, परेश शहा,किंटी आनंद, गणपत जगताप, अशोक गोतराने यांच्यासह विविध औद्योगिक, बांधकाम, व्यापारी, डॉक्टर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.