रविवार, ऑगस्ट 31, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

देशातील पहिल्या पाच शहरांमध्ये नागपूरचा समावेश होणार…वचननामाच्या प्रकाशनच्या वेळी गडकरींचा निर्धार

by Gautam Sancheti
एप्रिल 16, 2024 | 8:01 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
DSC 4069 e1713277860464


नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नागपुरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करून शहराला शिक्षण, पर्यटन, उद्योगाच्या क्षेत्रात संपूर्ण देशात नावलौकिक मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे, असा निर्धार व्यक्त करीत भविष्यात देशातील पहिल्या पाच शहरांमध्ये नागपूरचा समावेश होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (मंगळवार) व्यक्त केला.

रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये ‘वचननामा ते वचनपूर्ती’ या पुस्तिकेचे गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते संजय भेंडे, आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, शहराध्यक्ष बंटी कुकडे, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, माजी आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष प्रशांत पवार, शिवसेनेचे नेते (शिंदे गट) मंगेश काशीकर, माजी खासदार अजय संचेती, वचननामा संयोजन समितीचे सदस्य माजी आमदार गिरीश व्यास व ज्येष्ठ नेते जयप्रकाश गुप्ता, गिरधारी मंत्री, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, माजी आमदार प्रा. अनिल सोले, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, माजी महापौर कल्पना पांडे, माजी महापौर अर्चना डेहनकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी आदींची उपस्थिती होती. शहरात विविध ठिकाणी फूड झोन तसेच फुटाळा येथे २५ रेस्टॉरेन्ट आणि हॉकर्स झोन, ऑरेंज सिस्टी स्ट्रीटवर फ्रुट व व्हेजिटेबल झोन, वर्धा रोडवर सेंद्रीय धान्य व भाजी बाजार हे प्रकल्प होणार आहेत.

याशिवाय होलसेल किराणा मार्केटसाठी कळमना परिसरात जागा दिली असून त्याचेही बांधकाम सुरू झाले आहे, अशी माहिती ना. श्री. गडकरी यांनी यावेळी दिली. ९१ कोटी रुपये खर्चून महालमधील कल्याणेश्वर मंदिराचे कॉम्प्लेक्स, १२०० कोटी रुपये खर्चून सिंदी येथे लॉजिस्टीक्स पार्क आणि शहरात चार ठिकाणी ट्रक टर्मिनल देखील होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहराचा सर्वांगीण विकास होत असून गेल्या दहा वर्षांत १ लाख कोटींची कामे झाली आहेत. काही कामे सुरु आहेत, तर काही प्रगतीपथावर आहेत. नागपूर शहरासाठी आगामी पाच वर्षासाठी नव्या महत्वाकांक्षी योजना आखल्या असून, त्या पूर्ण झाल्यानंतर नागपूर शहर नवे स्मार्ट शहर म्हणून विकसित होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मिहानमध्ये आतापर्यंत ६८ हजार युवकांना रोजगार मिळाला असून यात विविध कंपन्या गुंतवणूक करीत आहेत. डिसेंबरपर्यंत हा आकडा एक लाखावर जाईल, असेही ते म्हणाले. बांगलादेश वस्तीच्या धर्तीवर शहरातील सर्व झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना मालकी हक्काचे पट्टे देण्यात येण्याचा येत्या काळात प्रयत्न असेल, असे ना. श्री. गडकरी यांनी सांगितले. सध्या ज्येष्ठांसाठी ७० ते ८० बगीचे विकसित करण्यात येत आहेत, त्यांची संख्या १०० पर्यंत नेण्यात येईल. औद्योगिक क्षेत्रातील रोजगार वाढीसाठी शैक्षणिक संस्था आणि उद्योजक यांच्या समन्वयातून नवी कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. अजनी येथे ‘युरोपियन स्क्वेअर’ विकसित करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

असा आहे वचननामा
तीन रेल्वे स्थानकांचा विकास, २५ लाख संत्र्यांच्या झाडांची लागवड, एम्प्रेस मिलच्या जागेवर टेक्सटाइल मार्केट, रिंग रोडवर ट्रॉली बस, पोलीस क्वार्टर्सचा विकास, मेयो ते लकडगंज या मार्गावर सहा मार्केट्स या भविष्यातील संकल्पांचाही गडकरी यांनी वचननाम्याच्या निमित्ताने उल्लेख केला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मालेगावात तरुणाचा खून करुन फरार झालेल्या आरोपीस मनमाड मधून पोलिसांनी घेतले ताब्यात

Next Post

चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार यांच्या प्रचार सभेत भुजबळांनी सांगितले जातीवर नाहीतर विकासावर मत द्या….

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Sushma Andhare
महत्त्वाच्या बातम्या

सुप्रिया सुळेंची गाडी रोखली, गाडीवर बाटल्या फेकल्या…ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची ही प्रतिक्रिया चर्चेत

ऑगस्ट 31, 2025
ycmou gate 6
स्थानिक बातम्या

मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस या तारखेपर्यंत मुदतवाढ

ऑगस्ट 31, 2025
Untitled 50
मुख्य बातमी

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासमवेत पंतप्रधानांची द्विपक्षीय चर्चा…झाले हे निर्णय

ऑगस्ट 31, 2025
WhatsApp Image 2025 08 31 at 1.51.19 PM 1024x683 1
संमिश्र वार्ता

केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी घेतले लालबागच्या गणेशाचे दर्शन

ऑगस्ट 31, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीची मालिका सुरूच…वेगवेगळया भागात पार्क केलेल्या तीन दुचाकी चोरीला

ऑगस्ट 31, 2025
DEVENDRA
महत्त्वाच्या बातम्या

सुप्रिया सुळेंची गाडी रोखली, गाडीवर बाटल्या फेकल्या…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर

ऑगस्ट 31, 2025
Supriya Sule e1699015756247
महत्त्वाच्या बातम्या

शरद पवार यांनी मराठ्यांचं वाटोळं केल्याच्या घोषणा, सुप्रिया सुळेंची गाडी रोखली, गाडीवर बाटल्याही फेकल्या

ऑगस्ट 31, 2025
rape2
क्राईम डायरी

मुंबईतील छायाचित्रकाराने तरूणीवर केला बलात्कार…पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ऑगस्ट 31, 2025
Next Post
IMG 20240416 WA0320 1 e1713279588511

चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार यांच्या प्रचार सभेत भुजबळांनी सांगितले जातीवर नाहीतर विकासावर मत द्या….

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011