दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील निळवंडी येथील विनय सुनील पाटील यांचे केंद्रीय लोकसेवा आयोग परिक्षेमध्ये देशात १२२ क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून दिंडोरी तालुक्याच्या नावलौकीक झाल्याने तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विनयला आयएएस व्हायचं आहे. निळवंडी येथील शेतकरी कुटूंबातील विनय सुनील पाटील याने जिद्द व चिकाटीने युपीएससी परिक्षेत यश संपादन केले.
नागरी सेवा परिक्षा ही भारतातील एक देशव्यापी स्पर्धात्मक परिक्षा आहे. जी केंद्रीय लोकसेवा आयोगाव्दारे भारत सरकारच्या उच्च नागरी सेवामध्ये भरतीसाठी घेतली जाते. उच्च श्रेणीच्या परिक्षेमध्ये ग्रामीण भागातून विनयने यश संपादन केल्याने त्याचे कौतुक होत आहे. निळवंडी येथील शेतकरी कुटूंबात विनयचा जन्म झाला. विनयचे आई – वडील शेतकरी असून विनयचे वडील सुनील मधुकर पाटील यांनी विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी आपल्या मुलाला युपीएससी परिक्षेसाठी प्रेरित केले.
२०२० पासून विनयने युपीएससीसाठी तयारी केली आणि तिसर्या प्रयत्नात विनयने उत्तुग भरारी घेत देशात १२२ क्रमांकाने उत्तीर्ण होत विजयाला गवसनी घातली.घरीच अभ्यास करत ऑनलाईन क्लास व वाचनालय येथे वाचन करत अभ्यास करून विनयने हे यश मिळवले. निकाल जाहीर झाल्याबरोबर दिंडोरी येथे फटाक्याच्या आतशबाजीत पेढे वाटप करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यांच्यावर दिंडोरी तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
तिसर्या प्रयत्नात मला यश मिळाले
जिद्द व चिकाटी असली की यश मिळते. मला माझ्या आई-वडीलांकडून शिकण्याची प्रेरणा मिळाली. तसेच २०१८ साली युपीएससी उत्तीर्ण झालेले आयपीएस यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मी २०२० पासून युपीएससीची तयारी केली आणि तिसर्या प्रयत्नात मला यश मिळाले. प्रयत्नात सातत्य ठेवल्यास यश नक्कीच मिळते, हे यातून सिद्ध झाले.
विनय सुनील पाटील,
युपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी
चार जणांना जिल्ह्यात यश
यावेळेस UPSC परिक्षते जिल्हयातील चार मुलांनी यश मिळवल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक येथील राका प्रिंटर्सचे चालक प्रशांत राका यांचे चिरंजीव उत्सव राका याने केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. तो देशात २७० व्या क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाला आहे. त्याने तिस-या प्रयत्नात हे य़श मिळवले आहे. नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील विनय सुनील पाटील हा ११३ क्रमाकं घेऊन उत्तीर्ण झाला. तर निफाड तालुक्यातील प्राथमिक शिक्षक असलेले विजयकुमार डेरले यांचे सुपुत्र आविष्कार डेरले यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत देशात ६०४ व्या क्रमांकावर येण्याचा मान मिळवला. येवल्यातून प्रियंका हिने यश मिळवले आहे..