नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –केंद्रीय लोकसेवा आयोगाने सप्टेंबर २०२३ मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षाच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. जानेवारी-एप्रिल, २०२४ दरम्यान व्यक्तिमत्व चाचणीसाठी झालेल्या मुलाखतींच्या निकालाच्या आधारावर, गुणवत्तेनुसार, पुढील पदांवर नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे: भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलीस सेवा, केंद्रीय सेवा, गट ‘अ’ आणि गट ‘ब’. एकूण १०१६ उमेदवारांची नियुक्ती साठी शिफारस करण्यात आली असून त्याचे तपशील पुढील प्रमाणे आहेत: शिफारस करण्यात आलेल्या ३५५ उमेदवारांचे अर्ज तात्पुरते राखून ठेवण्यात आले आहेत.
या परिक्षांमध्ये आदित्य श्रीवास्तवने ऑल इंडिया रँक मिळवली आहे. तर दुस-या नंबरवर अनिमेष प्रधान, तिस-या नंबरवर अनन्या रेड्डी यांनी यश मिळवले आहे. चौथ्या नंबरवर सिध्दार्त रामकुमार, पाचव्या स्थानावर रुहानी आहे.
युपीएससी च्या कॅम्पसमध्ये परीक्षा हॉलजवळ एक “मदत केंद्र” आहे. उमेदवारांना त्यांची परीक्षा / भरती याबाबतची कोणतीही माहिती/स्पष्टीकरण कामाच्या दिवशी सकाळी १० ते ५ या वेळेत थेट अथवा 23385271 / 23381125 / 23098543 या दूरध्वनी क्रमांकावर मिळवता येईल. निकाल युपीएससी च्या http//www.upsc.gov.in या वेबसाईट वर उपलब्ध आहे. निकाल जाहीर झाल्यापासून १५ दिवसांच्या आत संकेतस्थळावर गुण उपलब्ध होतील.