नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पांडवलेणी भागात कारमॉलमधून चोरट्यांनी तिजोरी चोरून नेल्याची घटना पांडवलेणी भागात घडली. या लॉकरमध्ये २ लाख ५५ हजाराची रोकड होती. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण गंगाराम शिगवण (रा.हिरावाडी पंचवटी) यांनी फिर्याद दिली आहे. शिगवण यांचा कार खरेदी विक्रीचा व्यवसाय असून पांडवलेणी भागात त्यांचा कार मॉल आहे. रविवारी (दि.१४) रात्री अज्ञात चोरट्यांनी मॉलमध्ये प्रवेश करीत कॅबीनच्या काचेचे दरवाजाचे लॉक तोडून ही चोरी केली.
मॉलच्या कॅबीनमध्ये शिरलेल्या चोरट्यांनी पैसे ठेवण्याची गोदरेज कंपनीची तिजोरी (लॉकर ) चोरून नेले. या लॉकरमध्ये सुमारे २ लाख ५५ हजाराची रोकड होती. अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.