मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा निवडणुकी अगोदरच शिवसेनेत फुट पडली. त्यामुळे ठाकरे यांच्याकडे चिन्ह व नावही गेले. त्यामुळे आता या निवडणुकीत मतदारांपर्यंत चिन्ह पोहचवण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मशाल चिन्हाच्या गीताचे लॅान्चिंग करण्यात आले.
यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, मशाल चिन्हाने आम्ही अंधेरी पोटनिवडणुकीपासून विजयी सुरुवात केली आहे. मशाल नुसतं चिन्ह नाही तर सरकार विरुध्द असंतोष मशालीच्या रुपाने भडकणार, हुकूमशाही, जुमलेबाजी जळून भस्म होईल असा विश्वास उध्दव ठाकेर यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना मशालीच चिन्ह मतादारापर्यंत घेऊन जाण्याचे आवाहन केले.