गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार करणा-या दोन्ही आरोपींना १० दिवसाची पोलिस कोठडी

by India Darpan
एप्रिल 16, 2024 | 1:18 pm
in संमिश्र वार्ता
0
Salman Khan

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः मुंबई पोलिसांना अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना पकडण्यात यश आले आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही आरोपींना सोमवारी रात्री उशिरा गुजरातमधील भुज येथे अटक केली. वैद्यकीय तपासणीनंतर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपी विक्की गुप्ता आणि सागर पाल यांना १० दिवसाची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. पोलिसांनी १४ दिवसाच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. मात्र त्यांना १० दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली.

दोन दिवसापूर्वी केलेल्या या गोळीबारामुळे खळबळ निर्माण झाली होती. त्यानंतर पोलिसांनी या आरोपींना पकडण्यासाठी तातडीने तपास सुरु केला. व अवघ्या दोन दिवसात या आरोपींना गजाआड केले. सीसीटीव्हीच्या आधारवर सुरु झालेल्या या आरोपींचा शोध सुरु झाला. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर हे आरोपी गुजरातमध्ये सापडले.

१४ एप्रिलला पहाटे ४.५५ वाजता दोघांनी वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर गोळीबार केला. दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी चार राऊंड फायर केले. त्यातील एक गोळी सलमानच्या घरात गेली. गोळीबाराच्या वेळी सलमान घरातच होता. गोळीबारानंतर सलमानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

गोळीबार करताना दोन्ही हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. हल्लेखोरांनी पांढरा टी-शर्ट आणि काळ्या स्वेट शर्ट घातला होता. दुसरा लाल टी-शर्टमध्ये होता. ज्या बंदुकीतून गोळीबार करण्यात आला, ती ७.६ बोअरची बंदूक असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. घटनास्थळावरून फॉरेन्सिक तज्ज्ञांना गोळी सापडली आहे. पोलिसांनी आरोपीची दुचाकीही जप्त केली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिककर देणार पर्यावरणाचा जाहीरनामा…. हालचाली सुरू

Next Post

नाशिक- मुंबई- आग्रा महामार्गावर रिक्षाचा अपघात…चालक जखमी

India Darpan

Next Post
IMG 20240416 WA0017 1 e1713254359819

नाशिक- मुंबई- आग्रा महामार्गावर रिक्षाचा अपघात…चालक जखमी

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011