नाशिक (इंडिया दर्पण वृत्तेसवा) – शबरी आवास योजनेअंतर्गत घराच्या बांधकामाचे फोटोज तसेच पाहणी केल्याचा अहवाल पंचायत समिती साक्री येथे सादर करण्यासाठी एक हजाराची लाच घेणा-या ग्रामीण गृह निर्माणचे कंत्राटी अभियंता परेश प्रदीपराव शिंदे यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांना शासनाच्या शबरी आवास योजनेअंतर्गत घर बांधायचे आहे. तक्रारदार यांना सदर योजने अंतर्गत अनुदानित निधी प्राप्त करण्याकरीता आलोसे यांच्याकडून तक्रारदार यांच्या घराच्या बांधकामाचे फोटोज तसेच पाहणी केल्याचा अहवाल पंचायत समिती साक्री येथे सादर होणे आवश्यक होते. तरी, वरील प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे एक हजार रुपये लाचेची मागणी करून सदरची लाच रक्कम ही पंचांसमक्ष स्वीकारल्याने त्यांचे विरुद्ध साक्री पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लाचेचा यशस्वी सापळा कारवाई
युनिट – ला.प्र.वि. धुळे
तक्रारदार- पुरुष, 40 वर्ष.
आरोपी – परेश प्रदीपराव शिंदे, वय-34 वर्ष, पद- ग्रामीण गृह निर्माण अभियंता (कंत्राटी), पंचायत समिती, ता. साक्री, जि धुळे.
*लाचेची मागणी- 1000/- रुपये दिनांक 15/04/2024 रोजी
*लाच स्वीकारली – 1000 /- रुपये दिनांक 15/04/2024 रोजी
लाचेचे कारण –
यातील तक्रारदार यांना शासनाच्या शबरी आवास योजनेअंतर्गत घर बांधायचे आहे. तक्रारदार यांना सदर योजने अंतर्गत अनुदानित निधी प्राप्त करण्याकरीता आलोसे यांच्याकडून तक्रारदार यांच्या घराच्या बांधकामाचे फोटोज तसेच पाहणी केल्याचा अहवाल पंचायत समिती साक्री येथे सादर होणे आवश्यक होते. तरी, वरील प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे 1000/- रुपये लाचेची मागणी करून सदरची लाच रक्कम ही पंचांसमक्ष स्वीकारल्याने त्यांचे विरुद्ध साक्री पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सापळा पर्यवेक्षण अधिकारी
*मा.श्री.अभिषेक पाटील, पोलीस उपअधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे.
*सापळा तपासी अधिकारी – रुपाली खांडवी – पोलीस निरीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे.
*सापळा पथक-
पो. हवा. राजन कदम, मुकेश अहिरे, पो.ना. संतोष पावरा,
पो.शि. प्रशांत बागुल, रामदास बरेला, चा. पोहवा सुधीर मोरे
*आलोसे यांचे सक्षम अधिकारी-
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद, धुळे.