नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठेकेदाराला देयकापोटी धनादेश अदा करण्यासाठी १५ हजार रुपये लाचेची रक्कम घेतांना धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील ग्रामसेविका राजबाई शिवाजी पाटील (४२) या लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकल्या. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाई बाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचा शेती व ठेकेदारीचा व्यवसाय असून त्यांनी चौगाव ता. शिंदखेडा या ग्रामपंचायत हद्दीत पेवर ब्लॉकचे व रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम केले होते. सदर कामाचा निधी मंजूर होऊन ग्रामपंचायतच्या बँक खात्यात जमा झालेला होता. तक्रारदार यांना त्यांच्या देयकापोटी धनादेश अदा करण्यासाठी ग्रामसेविका राजबाई शिवाजी पाटील यांनी २५ हजार हजार रुपये लाचेची मागणी पंचांसमक्ष करून तडजोड अंती १५ हजार रुपये घेण्याचे मान्य केले व आज रोजी पंचांसमक्ष १५ हजार रुपये लाचेची रक्कम आलोसे यांनी स्वतः स्वीकारल्याने त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लाचेचा यशस्वी सापळा कारवाई*
युनिट – ला.प्र.वि. धुळे.
तक्रारदार- पुरुष, 30 वर्ष.
आरोपी – राजबाई शिवाजी पाटील*, वय-42 वर्ष, व्यवसाय:- नोकरी, (ग्रामसेविका तालुका शिंदखेडा जि धुळे)
*लाचेची मागणी- 25000/- रुपये दिनांक 04/04/2024
*लाच स्वीकारली* 15000 /- रुपये दिनांक 15/04/2024
लाचेचे कारण –
यातील तक्रारदार यांचा शेती व ठेकेदारीचा व्यवसाय असून त्यांनी चौगाव ता . शिंदखेडा या ग्रामपंचायत हद्दीत पेवर ब्लॉकचे व रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम केले होते. सदर कामाचा निधी मंजूर होऊन ग्रामपंचायतच्या बँक खात्यात जमा झालेला होता. तक्रारदार यांना त्यांच्या देयकापोटी धनादेश अदा करण्यासाठी आलोसे यांनी 25000/- हजार रुपये लाचेची मागणी पंचांसमक्ष करून तडजोड अंती 15000/- रुपये घेण्याचे मान्य केले व आज रोजी पंचांसमक्ष 15000/- रुपये लाचेची रक्कम आलोसे यांनी स्वतः स्वीकारल्याने त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पर्यवेक्षण अधिकारी – अभिषेक पाटील, पोलीस उपअधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे.सापळा अधिकारी – हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे.
सापळा पथक-पो. हवा. राजन कदम, मुकेश अहिरे, पो.ना. संतोष पावरा, पो.शि.मकरंद पाटील, प्रविण पाटील, बडगुजर
*आलोसे यांचे सक्षम अधिकारी- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद, धुळे.