नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महायुतीचे चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ उद्या मंगळवार १६ एप्रिल रोजी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या चंद्रपूर मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे महायुतीचे चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ उद्या १६ एप्रिल २०२४ रोजी वेगवेगळ्या ठिकाणी जाहीर सभा घेणार आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्यासोबत उपस्थित असणार आहे.