नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा ग्राहक मंचमध्ये केस लवकर सुनावणीस घेण्यासाठी व त्यांना त्यांच्या कामासाठी पाहिजे असलेल्या फाईलचे कागदपत्र देण्यासाठी जिल्हा ग्राहमंचचे अभिलेखाकार धीरज मनोहर पाटील व शिरस्तेदार सोमा गोविंद भोये हे पाचशे रुपयाच्या लाच प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
धीरज पाटील यांनी रुपये ५०० इतक्या रकमेची पंचा समक्ष लाचेची मागणी करून ती पंचा समक्ष स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले भोये यांनी तक्रारदारास पाटील यांना लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिले म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, यातील तक्रार दारयांनी सावता नगर नाशिक मध्ये राधा क्लासिक अपार्टमेंट या इमारतीत 27,50000/- रुपये किंमतीचा फ्लॅट बुक केला होता. त्यासाठी त्यांनी रुपये 3,70000/- एवढा अॅडव्हान्स दिला होता. परंतु सदर बिल्डरने त्यांची फसवणूक करून त्यांचे नावावर परस्पर इंडिया बुल फायनान्स कडुन कर्ज मंजुर करून ते पैसे स्वतः परस्पर घेऊन त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. यासाठी तक्रारदार यांनी नाशिक जिल्हा ग्राहक मंच येथे दावा दाखल केला होता. तक्रारदार यांची केस लवकर सुनावणीस घेण्यासाठी व त्यांना त्यांच्या कामासाठी पाहिजे असलेल्या फाईलचे कागदपत्र देण्यासाठी धीरज पाटील यांनी रुपये ५०० इतक्या रकमेची पंचा समक्ष लाचेची मागणी करून ती पंचा समक्ष स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले .तसेच भोये यांनी तक्रारदारास पाटील यांना लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिले म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला.
यशस्वी सापळा कारवाई*
युनिट – नाशिक
तक्रारदार- महिला
आलोसे– 1)धिरज मनोहर पाटील वय 43 वर्ष पद -अभिलेखाकार वर्ग – 3, जिल्हा ग्राहक मंच नाशिक
2) सोमा गोविंद भोये वय 57 वर्ष ,पद -शिरस्तेदार वर्ग – 2 , जिल्हा ग्राहक मंच नाशिक
लाचेची मागणी रक्कम व दिनांक :- रुपये 500/- दिनांक 15 / 4 / 2024
लाच स्वीकारली रक्कम व दिनांक– रुपये 500/- दिनांक- 15 / 4 /2024
लाचेचे कारण – यातील तक्रार दार यांनी सावता नगर नाशिक मध्ये राधा क्लासिक अपार्टमेंट या इमारतीत 27,50000/- रुपये किंमतीचा फ्लॅट बुक केला होता. त्यासाठी त्यांनी रुपये 3,70000/- एवढा अॅडव्हान्स दिला होता. परंतु सदर बिल्डरने त्यांची फसवणूक करून त्यांचे नावावर परस्पर इंडिया बुल फायनान्स कडुन कर्ज मंजुर करून ते पैसे स्वतः परस्पर घेऊन त्यांना फ्लॅट चा ताबा दिला नाही यासाठी तक्रारदार यांनी नाशिक जिल्हा ग्राहक मंच येथे दावा दाखल केला होता. तक्रारदार यांची केस लवकर सुनावणीस घेण्यासाठी व त्यांना त्यांच्या कामा साठी पाहिजे असलेल्या फाईलचे कागदपत्र देण्यासाठी आलोसे क्रमांक 1 यांनी रुपये 500/- इतक्या रकमेची पंचा समक्ष लाचेची मागणी करून ती पंचा समक्ष स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले .तसेच आलोसे क्रमांक 2 यांनी तक्रारदारास आलोसे क्रमांक 1 यांना लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिले म्हणुन गुन्हा
*आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी –
मा .प्रबंधक (प्रशासन ) राज्य ग्राहक वाद निवारण आयोग ,महाराष्ट्र राज्य मुंबई
सापळा अधिकारी
विश्वजीत पांडुरंग जाधव पोलीस उप अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
मो.न. 9823388829
सापळा पथक–
पो. ह .प्रणय इंगळे
पो .ह .सुनिल पवार
सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक .