नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजीवनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ७८ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम महेंद्र पगारे (रा.सागर अपा. अश्वमेध कॉलनी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पगारे कुटूंबिय शनिवारी (दि.१३) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सुमारे ७७ हजार ९५० रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.