नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जेलरोड भागात राहणा-या ४० वर्षीय व्यक्तीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रविंद्र घुगे करंजकर (रा.कमल अपा.आयोध्यानगर) असे मृत इसमाचे नाव आहे. करंजकर यानी रविवारी (दि.१४) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात छतास नॉयलॉन दोरी बांधून गळफास लावून घेतला होता.
ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यास तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक कु-हाडे करीत आहेत.