इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदाच्या मान्सूनचा पहिला अंदाज वर्तवला आहे. सोमवारी आयएमडीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत यंदाच्या वर्षी देशात ८ जूनपर्यंत मान्सूनचं आगमन होण्याचा अंदा वर्तवला आहे.
२०२४ मधील मान्सूनच्या पहिल्या अंदाजानुसार यंदा सरासरीनुसार जास्त पावसाची शक्यता असून ५ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान सर्वत्र पाऊसच पाऊस असणार आहे. हवामान शास्त्रज्ञ एम. रविचंद्रन यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या मान्सूनसाठी सध्याची परिस्थिती आशादायी असून दक्षिण पश्चिम मान्सूनच्या दृष्टीने समुद्रातील परिस्थिती आशादायी असेल. एकंदर आकडेवारी आणि वा-याची स्थिती पाहता मान्सूनसाठी ही स्थिती पूरक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.