नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- औद्योगीक वसाहतीतील शिवाजी नगर भागात उधारीत शर्ट दिला नाही या कारणातून ग्राहकाने कोयत्याचा धाक दाखवित रेडिमेड कपडे विक्रेत्यास मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे नाशिकचे व्यापारी संतप्त झाले आहे.
मयुर गजानन पौळकर (रा.साई समर्थ अपा.छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयासमोर,शिवाजीनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अमन देविदास सुर्यवंशी (२७ रा. गंगासागर नगर,श्रमिकनगर) यांनी फिर्याद दिली आहे. सुर्यवंशी यांचे शिवाजीनगर येथे महाकाल फॅशन हब नावाचे रेडिमेड कपड्यांचे दुकान असून, संशयित शनिवारी (दि.१३) खरेदीसाठी दुकानात आला होता.
कपड्यांची पसंती करीत संशयिताने एक शर्ट उधारीत मागितल्याने ही घटना घटना घडली. सुर्यवंशी यांनी उधारीत शर्ट देण्यास नकार दिल्याने संतप्त संशयिताने त्यांच्यासह नोकरास शिवीगाळ व दमदाटी करीत धारदार कोयत्यांचा धाक दाखवून मारहाण केली. अधिक तपास पोलीस नाईक हिंडे करीत आहेत.