इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिकरोड पोलीस स्टेशन हद्दीत शिंदे गाव परीसरात अंमली पदार्थ मिळून आल्यानंतर पोलिसांना या हद्दीतील बंद असलेले गोडावून, आस्थापनांमधील अवैध, बेकायदेशीर साठयांवर कारवाई केली. या कारवाईत गाळयामध्ये १९९८-२००० मधील भारतीय बनावटीचा जुना विदेशी दारूचा साठा मिळून आला. हा साठा २ लाख ३२ हजार २१२ रूपये किंमतीचा असून तो जप्त करण्यात आला.
पळसे ता. जि. नाशिक येथील फुलेनगर, देवी रोड, गट नं. १३८६ मधील रोडलगत असलेल्या गाळयामध्ये सदर माल मिळून आल्याने गाळयाचा मालक तसेच गाळयात अवैधरित्या विदेशी दारूचा साठा करणा-या विरुध्द नाशिकरोड पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि गणेश शेळके हे करत आहेत.
सदरची कारवाई सहा. पोलीस आयुक्त नाशिकरोड विभाग, आनंदा वाघ आणि नाशिकरोड पोलीस ठाणेचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षकपवन चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश शेळके, पोउपनिरी केशव आडके, पोहवा अखलाक शेख, पोहवा संदीप पवार, पोना अनिल पवार, पोशि अरूण गाडेकर, मनोहर कोळी, भाऊसाहेब नागरे, यशराज पोतन, रोहीत शिंदे, कल्पेश जाधव, गोकुळ कासार यांनी केली.