इंडिया दर्पण ऑलनाईन डेस्क
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी आमदार चिमणराव पाटील यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून सर्वांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, आमदार चिमणराव पाटील, जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात पक्षांतराला पेव फुटले आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात भाजपचे नेते ठाकरे गटात गेले. तर भुसावळला पवार गटाने बंड पुकारला आहे. त्यामुळे जळगावमध्ये नेमकं काय चाललं हे कळतच नसल्याचे येथील जेष्ठ नेते बोलू लागले आहे.