मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे येथून नेपाळकडे जात असलेली ट्रॅव्हल बस मनमाड-मालेगाव महामार्गावर व-हाणे गावा जवळ पलटी झाली. या अपघातात जवळपास ५० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहे.
हा अपघात होताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत जखमींना बाहेर काढत त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे पाठविले आहे. तर या अपघातात एका दहा वर्षाच्या मुलाचा हात अडकल्याने जेसीबीच्या सहाय्याने त्याला मदत करत बाहेर काढण्यात आले.
स्टेरिंग रॉड तुटल्यामुळे हा अपघात झाल्याच बोलले जात आहे.सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला आहे.