इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदार संघातून वंचित बहुजन विकास आघाडीकडून उमेदवारी मिळाल्यानंतर अफसर खान यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. या ठिकाणी त्यांनी फुल अर्पण केले. या घटनेमुळे नवा राजकीय वाद सुरु झाला आहे.
वर्षभरापूर्वी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबच्या कबरीला भेट दिल्यामुळे वाद झाला होता. आता त्यांच्या उमेदवाराने कबरीला भेट दिल्यामुळे या निवडणुकीत राजकीय वातावरण तापले आहे.
छत्रपती संभाजी नगरमध्ये नेहमीच निवडणूक काळात असे वाद निर्माण करुन मते मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. तो याही निवडणुकीत केला गेला असला तरी त्याचा कितपत फायदा वंचितच्या उमेदवाराला होतो हे महत्त्वाचे आहे.