इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस टप्याटप्याने उमेदवारांची यादी जाहीर करत आहे. रविवारी काँग्रेसने दिल्ली, पंजाब व उत्तरप्रदेशमधील उमेदवारांची यादी जाहीर केली. १० उमेदवारांच्या या यादीत दिल्लीतील ३ जागा, पंजामधील ६ जागा व उत्तरप्रदेशमधील एका जागेचा समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीत ईशान्य दिल्लीतून भाजप उमेदवार मनोज तिवारी विरुध्द काँग्रेसने कन्हैया कुमार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे येथील सामना रंगतदार होणार आहे.
या यादीत काँग्रेसने दिल्लीत जे.पी. अग्रवाल यांना चांदनी चौकातून उमेदवारी दिली आहे. तर भाजपने प्रवीण खंडेलवाल यांना या मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. तर उत्तर – पश्चिम दिल्लीतून उदित राज यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. येथे भाजपने योगेंद्र चंदोलिया यांची उमेदवार घोषीत केली आहे. दिल्लीतील आप व काँग्रेसने आघाडी केल्यामुळे काँग्रेसच्या वाटयाला तीन जागा आल्या असून या तिन्ही जागेवर काँग्रेसने उमेदवार दिले आहे.