अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- श्री रामनवमी उत्सव २०२४ निमित्ताने सालाबादप्रमाणे शिर्डी येथे भाविक श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणार असल्याने भाविकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. गर्दीमुळे भाविकांची व जनतेची गैरसोय होवु नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३(१) (ब) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून दि. १६ ते १८ एप्रिल, २०२४ या कालावधीत अहमदनगरकडून मनमाडकडे येणाऱ्या खासगी व प्रवासी वाहतुकीच्या मार्गात बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत.
अहमदनगरकडुन मनमाडकडे येणारे खाजगी व प्रवासी व इतर मोठ्या वाहनांसाठी वाहतुकीसाठी मार्ग आर.बी. एल चौक द्वारका सर्कल चौक श्री साईनाथ हॉस्पीटल चौक – श्री राम सर्कल चौक- झुलेलाल चौक- लक्ष्मीनगर चौक टी पॉईंट असा असणार आहे. अहमदनगरकडुन मनमाडकडे येणारे खाजगी व प्रवासी व इतर मोठ्या वाहनांसाठी लक्ष्मीनगर चौक टी पॉईंट,- झुलेलाल चौक- श्री राम सर्कल चौक- श्री साईनाथ हॉस्पीटल चौक-द्वारका सर्कल चौक – आर.बी.एल चौक या रोडवरील येणारी सर्व वाहतूक वळविण्यात आली असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.