इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सलमान खानच्या घराबाहेर झालेला गोळीबार लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने केल्याचे आता समोर आले आहे. त्याची जबाबदारी बिश्नोईच्या भावानेच घेतली आहे. याबद्दलची एक पोस्टही सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे.
या पोस्टमध्ये म्हणण्यात आले की, आम्हाला शांतता हवी आहे, दडपशाहीविरोधात निर्णय युद्धातून आला तर ते योग्य आहे. सलमान खान तुला ट्रेलर दाखवण्यासाठी आम्ही हे केले आहे. जेणेकरून तुला आमची ताकद समजेल. हेच नाही तर आम्ही तुला ही शेवटची वार्निंग देतो असेही या पोस्टमध्ये म्हणण्यात आले आहे. यानंतर या गोळ्या फक्त घरावर चालणार नाहीत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही पोस्ट अनमोल बिश्नोईने शेअर केलीये. अनमोल बिश्नोई हा लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ असल्याचे देखील सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच लॉरेन्स बिश्नोई हा सलमान खान याला जीवे मारणार असल्याचे बोलताना दिसला. त्याने सलमान खान याला मेल करूनही जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत.