इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. वांद्रा येथील गॅलक्सी इमारतीबाहेर हा गोळीबार पहाटेच्या सुमारास ५ वाजता करण्यात आला. २ अज्ञांनाकडून ४ राऊंड फायर करण्यात आले. हे दोन्ही अज्ञात हे दुचाकीवर आले होते. या गोळीबारात एक गोळी गॅलरीतून घरात घुसली तर दुसरी गोळी घराच्या भिंतीला लागल्याचे बोलले जात आहे. हल्याच्या वेळी सलमान घरीच होता.
या घटनेनंतर चित्रपटसृष्टीत खळबळ निर्माण झाली आहे. लॅारेन्स बिश्नोई गॅंगकडून या अगोदरच सलमान खानला धमकी देण्यात आली होती. . या घटनेनंतर वांद्रे पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहचले आहे. या घटनेचा धमकीशी संबध आहे का याचा तपासही ते करणार आहे. दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही फुटेचही मिळाले आहे.