इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चेन्नईः रेल्वेने गुगल ट्रान्सलेटची मदत घेतल्याने एका ट्रेनचे रूपांतर खुनाच्या एक्स्प्रेसमध्ये झाल्यामुळे रेल्वेला चांगल्याच टीकेचा सामना करावा लागला. भाषांतरासाठी गुगल ट्रान्सलेटची मदत घेतल्याने मुळ अर्थच बदलला. रेल्वेने हटियाचे मल्याळममध्ये कोलापथकम असे भाषांतर केले. ज्याचा हिंदीत अर्थ आहे, हत्यारा होता.
हटिया-एर्नाकुलम एक्स्प्रेसवर ‘हत्या’ नावाच्या फलकाचा फोटो ‘सोशल मीडिया’वर व्हायरल झाला. त्यात या भाषांतरामुळे हातिया स्टेशनचे नाव हत्या स्टेशन झाले. तेव्हा रेल्वेला आपली चूक लक्षात आली व त्यांनी ती मान्यही केली.
रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘हटिया’ म्हणजेच ‘हत्या’ या हिंदी शब्दाच्या गोंधळामुळे ही चूक झाली. रेल्वे अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत मल्याळम शब्द पिवळ्या रंगाने झाकून टाकला. हटिया हे रांचीमधील ठिकाण आहे. हटिया-एर्नाकुलम एक्स्प्रेस आठवड्यातून एकदा चालते.