नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेसने आपला जाहीरनामा अगोदर प्रसिध्द केला. त्यानंतर आज भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. दिल्लीतील भाजप मुख्यालयात निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींनी २५ जानेवारी रोजी निवडणूक जाहीरनाम्यासाठी जनतेकडून सूचना मागवल्या होत्या. पक्षाला १५ लाखांहून अधिक सूचना मिळाल्या आहेत. नमो ॲपद्वारे ४ लाख सूचना प्राप्त झाल्या आहेत आणि व्हिडिओद्वारे ११ लाख सूचना प्राप्त झाल्या होत्या. यातील काही सूचनाही यात समावेश करण्यात आला आहे.
या जाहीरनाम्यात मुद्रा योजनेच्या कर्जाची मर्यादा २० लाखापर्यंत वाढवणार, गरिबांसाठी ३ कोटी घर निर्माण करणार, नागरिकांना कमी दरात औषध मिळणार, पाईपलाईनव्दारे प्रत्येक घरी गॅस, महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ट्रेनिंग देणार, गरीब कल्याण योजनेचा विस्तार करणार,यासह अनेक घोषणा संकल्प पत्रात करण्यात आल्या आहे. तर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण…