इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावर शनिवारी दगडफेक करण्यात आली. त्यात ते जखमी झाले आहे. जगन मोहन रेड्डी शनिवारी विजयवाडा येथील सिंहनगर परिसरात प्रचार करत होते. यावेळी गर्दीतील अज्ञात व्यक्तीने फिरकावलेल्या दगडाने जगन मोहन रेड्डी यांना दुखापत झाली.
दगडाच्या फटक्याने रेड्डी यांचा त्यांच्या भुवईच्या वरच्या भागातून रक्त येत होते. या घटनेनंतर रेड्डी यांनी प्रथमोपचार घेत पुन्हा प्रचाराला सुरुवात केली. या घटनेनंतर वायएआर काँग्रेसच्या नेत्यांनी तेलुगू देसम पक्षावर आरोप केला आहे.