इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ड्रग्ज माफिया ललीत पाटील हा फरार झाल्यानंतर तो नाशिकला एका महिलेकडे दिवसभर थांबल्याचे समोर आले आहे. या महिलेचा गुन्हेशाखा युनिट-१ ने शोध घेऊन तिला अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या ताब्यात दिले. या महिलेकडे ५ लाख, १२ हजार रूपये किंमतीची ७ किलो चांदी मिळाली आहे. याबाबत चौकशी केल्यानंतर ललीत पाटील याने चांदी घेऊन न जाता २५ लाख रूपये अशी रोख रक्कम घेऊन गेल्याचे सांगीतले. सदर महिलेस पुढील चौकशीकामी पुणे पोलीसांच्या ताब्यात देण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नाशिक, पुणे व मुंबई पोलीसांकडून घेण्यात येत होता. त्या दरम्यान नाशिक पोलीसांना याबाबत माहिती मिळाली होती की, ललीत पाटील याने पुणे येथून पलायन केल्यानंतर तो नाशिक येथे येऊन गेला होता. त्याने एका महिलेकडे एक दिवस वास्तव्यास केले होते. त्या ठिकाणी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची गोपनीय संशयास्पद माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी शोध घेऊन या महिलेला शोधून तीच्यावर कारवाई केली.
अंमली पदार्थाची विक्री करणारे सराईत गुन्हेगार
ताब्यात अंमली पदार्थ विरोधी पथक व गुन्हेशाखेची कारवाई
पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी पोलीस आयुक्तालय हददीत चार विशेष पथके स्थापन करून अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केले होते. त्यापैकी अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाईमध्ये सातत्य ठेवुन अंमली पदार्थांची विक्री करणारे व्यक्तींची धरपकड करून कारवाया केलेल्या आहेत. त्यामध्ये सन २०२३ मध्ये अंमली पदार्थ बाळगणे व खरेदी विक्री संदर्भाने १० गुन्हे व अंमली पदार्थ सेवन करण्याच्या ०५ व शाळा / महाविदयालय परिसरात सार्वजनिक ठिकाणी तंबाखुजन्य पदार्थ विक्री व सेवन करणा-या इसमांवर कोटपा कायदयाअंतर्गत ३५७ केसेस करण्यात आलेल्या आहेत. सध्या अंमली पदार्थ विरोधी पथक खालील प्रमाणे एम.डी. संदर्भात गुन्हयांचा तपास करत आहे. (एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ चे कलम ८(क), २०(ब), २२ (क), २९)
ही मोठी माहिती देण्याबरोबरच पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईचा एक चार्ट दिला आहे.
ही मोठी माहिती देण्याबरोबरच पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईचा एक चार्ट दिला आहे.