नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेसने आपला जाहीरनामा अगोदर प्रसिध्द केला. त्यानंतर आज भाजप लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान मोदींनी २५ जानेवारी रोजी निवडणूक जाहीरनाम्यासाठी जनतेकडून सूचना मागवल्या होत्या. पक्षाला १५ लाखांहून अधिक सूचना मिळाल्या आहेत. नमो ॲपद्वारे ४ लाख सूचना प्राप्त झाल्या आहेत आणि व्हिडिओद्वारे ११ लाख सूचना प्राप्त झाल्या आहेत.
भाजपच्या जाहीरनाम्याची थीम सांस्कृतिक राष्ट्रवादासह मोदीची हमी: विकसित भारत २०४७ वर केंद्रित असेल. ज्या आश्वासनांची पूर्तता करता येईल, तीच आश्वासने पक्ष जाहीरनाम्यात समाविष्ट करेल. विकास, समृद्ध भारत, महिला, तरुण, गरीब आणि शेतकरी यावर या जाहीरनाम्यात भर असेल. भाजपच्या जाहीरनामा समितीमध्ये ४ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह २७ सदस्य आहेत