नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- देशात लोकसभा निवडणूकींची घोषणा झाल्यानंतर काँग्रेसकडून विकास ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर नागपूरच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ नेते संविधान बदलण्याची भाषा जाहीरपणे करत असतात. त्याविरोधात सर्व बहुजन एकत्र आले असून या संविधान रक्षणाचा लढा आणखी तीव्र करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उद्या आज दुपारी एक वाजता दिक्षाभूमी येथे संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्धांना अभिवादन करतील.
त्यानंतर दुपारी ३ वाजता मध्य नागपुरातील गोळीबार चौक येथे इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत नागरिकांना मार्गदर्शन करणार आहे.
काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे समर्थन मिळत असल्याचे बघून सत्ताधारी भाजप नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. आता ही लढाई नागपूरकर विरुद्ध भाजपा अशी झाली आहे. त्यातूनच पराभवाच्या भितीमुळे भाजपला काँग्रेसचे जनसेवक विकास ठाकरे यांच्या विरोधात पंतप्रधान, दोन राज्यांचे मुख्यमंत्री बोलाविण्याची नामुष्की ओढावली आहे. मात्र देशाचे लक्ष लागलेल्या या लढतीत ठाकरेंचे हात बळकट करण्यासाठी यापूर्वीही काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह अनेक दिग्गज नेते जन आशीर्वाद यात्रा आणि जाहीर सभांमध्ये सहभागी झाले होते.