इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रावेर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाने श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या माजी आमदार संतोष चौधरी समर्थकांनी राजीनामा सत्र सुरु केले आहे. ऐनवेळी चौधरी यांची उमेदवारी कापण्यात आल्याने त्यांचे समर्थक प्रचंड नाराज आहे. तीन महिन्यात तीन पक्ष बदलणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी दिल्यामुळे त्यांचा संताप आहे. राजीनामा देणा-यांमध्ये भुसावळ, वरणगाव व रावेर तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहे.
चौधरी यांना तिकीट मिळणार म्हणून या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. पण त्यांचे तिकीट कापल्याने त्यांच्या समर्थकांनी सामूहिक राजीनामे देऊन आंदोलन केले. चौधरी हे शरद पवार गटात बंड करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चौधरी हे अपक्ष उमेदवार म्हणून रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे चौधरी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.