इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अकोलाः भाजपबरोबर महाविकास आघाडीची ‘मॅच फिक्सिंग’ असल्याचा आरोप ‘वंचित’चे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केल्यानंतर त्याची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वापरलेला मॅच फिक्सिंग हा शब्द दुर्दैवाने महाविकास आघाडीनेच प्रत्यक्ष महाराष्ट्रात, असे ते म्हणाले. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून देण्यात आलेला उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाविरोधात लढू शकत नाही. नाना पाटोले यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी माघार घेतली. नांदेडमध्ये दिलेला उमेदवार तीन दिवस डायलिसिसवर असतो, असे त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲड. आंबेडकर यांची उमरखेड येथे प्रचारसभा झाली. त्या वेळी आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत नेत्यांचा कडक शब्दात समाचार घेतला. रामटेकमधील काँग्रेसमधील उमेदवाराचे जात पडताळणी प्रमाणपत्र टिकणार नाही हे सर्वांनाच माहीत होते, तरीही त्यांना उमेदवारी दिली. ऐनवेळी उमेदवारी रद्द झाल्यानंतर रश्मी बर्वे यांच्या पतीला उमेदवारी जाहीर करण्यात आली. काँग्रेस म्हणते, आम्हाला संविधान वाचवण्यासाठी मत द्या मग ‘वंचित’ला दोनच जागा का द्यायला निघाल्या, असा सवाल त्यांनी केला.