इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर न झाल्यामुळे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे संतप्त झाले आहे. त्यांनी थेट कोर्टात कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. सत्तेत असतांना दिलेल्या या इशा-यामुळे राजकीय वर्तूळात खळबळ निर्माण झाली आहे. या विषयावर नांदगाव येथे पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
नाशिक जिल्ह्यात यंदा पूर्व भागात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके हातची गेली. नांदगाव तालुक्यात जून ते सप्टेंबर दरम्यान इतर तालूक्याच्या तुलनेत केवळ ६४.३ टक्के पाऊस झाल्याची नोंद झालेली असताना ट्रिगर १ आणि २ मध्ये नांदगाव तालुक्याचा समावेश झाला नाही. त्यामुळे आ. कांदे संतप्त झाले. तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असूनही जर ३६ पैसे आणेवारी लावली गेलेली असताना दुष्काळी तालुका जाहीर होत नसेल तर थेट न्यायालयात जाण्याचा इशारा आमदार कांदे त्यांनी दिला.
आजी माजी पालकमंत्री यांचा मालेगाव व येवला तालुका ट्रीगर २ मध्ये दाखविला जातो. मग माझा मतदार संघात कमी पाऊस होऊन तो ट्रिगर १,ट्रिगर २ मध्ये बसत नाही का असा सवाल उपस्थित करत जर शासनाने तालुका दुष्काळी जाहीर केला नाही. तर न्यायालयात दाद मागू असा इशारा देत या अगोदर आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.