विषारी औषध सेवन करून ६५ वर्षीय वृध्दाची आत्महत्या…
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ६५ वर्षीय वृध्दाने विषारी औषध सेवन करून आपले जीवन संपविले. पेठरोडवरील फुलेनगर भागात ही घटना घडली. या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भालचंद्र गंगाराम राऊत (रा.शेषराव महाराज चौक फुलेनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. राऊत यांनी शुक्रवारी (दि.१२) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच शेजारी नितीन गंगावणे यांनी त्यांना तातडीने नजीकच्या लिलावती व बिरसा मुंडा हॉस्पिटल मध्ये दाखल केले.
त्यानंतर त्यांना जिल्हा रूग्णलयात हलविले असता डॉ.उमंग अग्रवाल यांनी उपचार सुरू असतांना मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक मोरे करीत आहेत.
चाकू घेवून फिरणा-या एकावर पोलीसानी कारवाई
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीत धारदार चाकू घेवून फिरणा-या एकावर पोलीसानी कारवाई केली. संशयिताच्या ताब्यातून लोखडी चाकू हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल चिंतामण गवळी (४० रा. महालक्ष्मीचाळ, महाराणा प्रताप नगर पेठरोड ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित चाकूधारीचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई भुषण शेजवळ यांनी फिर्याद दिली आहे. कामगारनगर येथील रिलायन्स पेट्रोलपंप भागात एका तरूणाकडे चाकू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार वर्णनावरून पथकाने त्यास गाठून अंगझडती घेतली असता त्याच्याकडे धारदार लोखंडी चाकू मिळून आला. पथकाने चाकू हस्तगत केला असून याबाबत पोलीस दप्तरी शस्त्रबंदी कायद्याचे उलंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार अनिल आहेर करीत आहेत.