इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
यवतमाळ व वाशिम लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळी यांना शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी न दिल्यामुळे त्या नाराज होत्या. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदार संघाची आढावा बैठक घेतली. त्यावेळेसही त्यांनी पाठ फिरवली. त्यानंतर आज त्यांनी थेट पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. त्यात म्हणाल्या की, माझ्या वडिलांनी ८५ पासून शिवसेनेचे काम केले आमच्या घराणे पक्षासाठी योगदान दिले आहे. मुख्यमंत्र्यांचे हात मजबूत करण्यासाठी मी मैदानात उतरणार आहे. जयश्री ताईंचे हात मजबूत करणार आहे. मोदींचे हात मजबूत करणार आहे.
यावेळी आपली भूमिका स्पष्ट करतांना त्या म्हणाल्या की, मी प्रचाराला जात नसल्याने नाराज असल्याच्या चर्चा आहे. मी नाराज होणारी नाही. मला खंत आहे. मी इतकी वर्ष कामे केली. तरीही तिकीट दिले नाही. इतर खासदारांना उमेदवारी मिळाली. मला खंत वाटली. त्यामुळे मी बाहेर पडली नाही.
माझ्यासाठी पक्ष महत्त्वाचा आहे. पक्षाचे नेते महत्त्वाचे आहेत. माझ्यासाठी शिंदे साहेब महत्त्वाचे आहे. मोदी साहेब महत्त्वाचे आहेत. फडणवीस साहेबांनी मतदारसंघाच्या विकासासाठी पाठबळ दिले. मुख्यमंत्री शिंदे साहेबांसोबत अनेक मुद्द्यावर पक्षाच्या दृष्टीकोनातून चर्चा झाली आहे. उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी मला दिली आहे. त्यांच्यासाठी मी प्रचार करेल यात काही दुमत नाही. असे भावना गवळी म्हणाल्या.