जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरातील जुने विद्युत मीटर बदलण्यासाठी २५ हजाराची लाच घेतांना जळगाव येथील म.रा.वि.वि .कंपनीतील वरिष्ठ तंत्रज्ञ संतोष भागवत प्रजापती (३२) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. त्याला ही लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले.
या कारवाईबाबत एसीबीने सांगितले की, तक्रारदार यांचे आईचे नावाने घराचे जुने विज मिटर असून यातील आलोसे यांनी विज मिटर हे जुने असून नादुस्त आहे. तुम्हाला नवीन मिटर बसावावे लागेल त्यासाठी मला २५ हजार रुपये द्यावे लागतील असे तक्रारदार यास सांगितले. त्यांनतर आज प्रजापती यांनी पंचासमक्ष २५ हजाराची लाचेची मागणी करून स्विकारली. यावेळेस तंत्रज्ञ प्रजापतीला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर रामानंदनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आला.
अशी केली सापळा कारवाई
युनिट – जळगाव.
तक्रारदार- पुरुष,वय-59 रा. जळगांव जि.जळगांव
आलोसे- संतोष भागवत प्रजापती वय 32, व्यवसाय , वरिष्ठ तंत्रज्ञ(वायरमन)
आदर्श नगर कक्ष म.रा.वि.वि .कंपनी जळगांव रा. जळगांव जि.जळगांव वर्ग-4
*लाचेची मागणी- 25000/-
*लाच स्विकारली- 25000/ रुपये
*हस्तगत रक्कम- 25000/-रुपये
*लालेची मागणी – दि.18/10/2023
*लाच स्विकारली – दि.18/10/2023
लाचेचे कारण
यातील तक्रारदार यांचे आईचे नावाने घराचे जुने विज मिटर असुन यातील आलोसे यांनी विज मिटर हे जुने असून नादुस्त आहे तुम्हाला नविन मिटर बसावावे लागेल त्यासाठी मला 25000 हजार रुपये द्यावे लागतील असे तक्रारदार यास सांगितले त्यांनतर आज आलोसे यांनी पंचासमक्ष 25000 रुपयांची लाचेची मागणी करून यातील आलोसे यांनी पंचा समक्ष 25000/ रुपये स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर रामानंदनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
*सापळा पर्यवेक्षण अधिकारी
श्री.सुहास देशमुख, -पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव
*सापळा व तपास अधिकारी – एन.एन. जाधव,पोलिस निरीक्षक
सापळा पथक सफौ दिनेशसिंग पाटील, पो.ना. बाळू मराठे
*कारवाई मदत पथक- अमोल वालसाडे, पोलीस निरीक्षक, स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे,पो.कॉ. प्रदीप पोळ,पो.कॉ. राकेश दुसाणे, पो.कॉ अमोल सुर्यवंशी, पो. कॉ.प्रणेश ठाकुर