नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नारायणनगर भागात मोजणी यंत्राचे नुकसान करीत एकाने भूकरमापकास शिवीगाळ व दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश सुभाष पवार (३४ रा.अपोलो हॉस्पिटल जवळ,स्वामी नारायण नगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी भुकर मापक योगेश सदगिर यांनी फिर्याद दिली आहे. सदगिर शुक्रवारी (दि.१२) आपल्या सहका-यांसमवेत स्वामी नारायण नगर भागात मोजणीच्या कामानिमित्त गेले असता ही घटना घडली.
सर्व्हे नं. २८४ ची शासकिय मोजणी सुरू असतांना संशयिताने विरोध करीत अधिकारी व कर्मचाºयांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ आणि दमदाटी केली. या घटनेत संतप्त संशयिताने मोजणी यंत्र (रोव्हर मशिन) चे नुकसान केले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.