मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील अनेक रस्ते काही महिन्यांपुर्वी सिमेंटचे बनविण्यात आले. मात्र काही दिवसातच या रस्त्यांवर खड्डे पडल्याने ठेकेदाराने केलेल्या कामाचे पितळ उघडे पडले. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी या कामावर आक्षेप घेत. रस्त्याचे काम कसे झाले व त्याची दुरुस्ती कशी सुरु आहे याचा व्हिडिओच व्हायरल केला.
विशेष म्हणजे हे खड्डे नगर परिषदेच्या समोर मोठ्या प्रमाणात पडलेले असल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणूका या मार्गावरुन जाणार असल्याने ठेकेदाराने त्या रस्त्यांवर दगडाची कच टाकून त्यावर पाणी शिंपडल्याचा प्रकार ठाकरे गटाच्या शहर प्रमुख यांच्या निदर्शनास आले.
त्यानंतर त्यांनी रस्त्यावरील कच कशी लगेच निघून जात असल्याचे दाखवले. एकुणच ठेकेदाराने केलेल्या कामाचे बिल तर त्याला अदा केले मात्र रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे बिल मात्र नगर परिषदेला भरावे लागणार असल्याने हा शहरातील नागरीकांनी कर रूपाने भरलेल्या पैशाची उधळपट्टी असल्याचा आऱोप शिवसेना ठाकर गटाचे शहर प्रमुख माधव शेलार यांनी केला.