इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पाचवेळा खासदार असलेल्या भावना गवळी यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांची नाराजी आजही कायम आहे. मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. पण, त्यांनी या बैठकीककडे पाठ फिरवली. आता ते आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.
दोन दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत आणि जानकर यांनी भेट घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्याचाही काही उपयोग झाला नाही. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजश्री पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे या मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गवळी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजारो लोकांच्या समोर गवळी माझी सख्खी बहिण आहे, असे वक्तव्य केले होते. कोणताही राजकीय अन्याय होणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले होते. पण, त्यानंतरही त्यांची नाराजी दूर झाली नाही. आता पत्रकार परिषदेत काय भूमिका घेतात त्यावर बरंच काही अवलंबून आहे.